महाराष्ट्र

ट्रेलर दुभाजकाला धडकून पलटला, चालकाचा केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू

रायगड : रायगड जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खैरेवाडी येथे ट्रेलर दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलर चालक पवन शिवाजी जाधव (वय ३३) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद नागोठाणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात अपघातासाठी अत्यंत धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरवाडी स्टॉपच्या समोर ट्रेलर दुभाजकाला धडकून हा अपघात झाला.

१६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलाड बाजुकडून वाकणच्या दिशेने कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर क्र. एमएच ४६ बीएम ६३३१ सुकेळी खिंडीच्या उतारावरती आला असता ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर दुभाजकाला धडकला. या धडकेत ट्रेलरवरील कंटेनर १० ते १५ फुट अंतरावर उडून गेला आणि ट्रेलर पलटी झाला. ट्रेलर चालक पवन शिवाजी जाधव (वय ३३) हे केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यूमुखी पडले.

सुदैवाने, या अपघाताच्या वेळी दुसरे कोणतेही वाहन घटनास्थळी उपस्थित नव्हते, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाकण वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. हायड्राच्या सहाय्याने ट्रेलरचालकाला केबीनमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जिंदाल रुग्णालयाच्या रुग्णवाहीकेतून नागोठाणे सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास नागोठाणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago