Ladki Bahin Yojana
नागपूर : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याच्या घोषणेनंतर या महिन्यापासूनच 2100 रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सरकार सहावा हप्ता कधी देणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरीही या महिन्यात किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येऊ शकतात अशी बातमी आहे.
दरम्यान, सोमवारी नागपूर अधिवेशनादरम्यान, महाराष्ट्र सरकारने 33,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद आहे.
मागील अर्थसंकल्पात, माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने वार्षिक 46,000 कोटी रुपयांची घोषणा केली होती. 2.5 कोटींहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत. आता सरकारने या भत्त्याची रक्कम वाढवून 2,100 रुपये केली आहे.
आतापर्यंत 5 हप्ते जारी
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने आतापर्यंत पाच हप्ते जारी केले आहेत. आता या महिन्यापासून सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे. या हप्ता वितरणाची तारीख आणि संबंधित आदेश लवकरच शासनाकडून जारी करण्यात येईल. आदेश जारी झाल्यानंतर, संबंधित रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…