पुणे

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, नंतर पोलीस ठाण्यात पतीची आत्महत्या

पुणे : तळवडे येथील शरद रूपचंद चितळे (वय ३५) नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला गळा दाबून मारले. यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून त्याला वाचवले. मात्र, त्यानंतर चौकशीसाठी चिखली पोलिस ठाण्यात बोलावले असता तेथेच त्याने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, चितळे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. त्याची पत्नी कांचन (वय २६) आशा वर्कर म्हणून काम करत होती. १३ एप्रिल रोजी शरदने पत्नीचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला वाचवून रुग्णालयात दाखल केले. शरदच्या पत्नीला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात कांचन यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले.

शरदला निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १८ एप्रिल रोजी शुक्रवारी चितळे यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, त्यानंतर कांचनच्या मृत्यूच्या चौकशीचा भाग म्हणून त्यांना त्यांच्या कुटुंबियांसह चिखली पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र, चौकशी दरम्यान शरद याने लघुशंकेचा बहाणा करून स्वच्छतागृहात जाऊन आतून दरवाजा बंद केला. शरद बराच वेळ न परतल्याने शंका येताच पोलिसांनी दरवाजा तोडला, त्यावेळी शरद चितळे बेशुद्धावस्तेत आढळले, त्याने फरशी पुसण्याचे लिक्विड पिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शनिवारी पहाटे २.५० वाजता पोलिसांनी त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago