Viman Nagar Accident: 28-Year-Old Sachin Dhumal Dies After Dumper Runs Over Scooter Rider
पुणे : रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विमान नगर–खराडी बायपासवरील टाटा गार्डरूम बसस्टॉपजवळ झालेल्या भीषण अपघातात सचिन वसंत धुमाळ (वय २८, रा. मल्हारनगर, वडगावशेरी) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन धुमाळ हा त्याचा मित्र स्वप्नील भानुदास माने (वय २५) याच्यासोबत अॅक्टिव्हा स्कूटरवरून विमान नगरकडून खराडीच्या दिशेने जात होता. दरम्यान, मागून येणाऱ्या एका डंपर चालकाने जोरात हॉर्न वाजवला. त्यामुळे गडबडल्याने सचिनचा स्कूटरवरील ताबा सुटला आणि दोघे रस्त्यावर पडले. या वेळी डंपरने सचिनला चिरडले, तर स्वप्नील किरकोळ जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने सचिनला ससून रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…