मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. धर्मेंद्र यांची मुलगी, अभिनेत्री इशा देओल हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.
इशा देओलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “माध्यमांतून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझे वडील धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. कृपया आमच्या कुटुंबाची प्रायव्हेसी जपावी. वडिलांच्या लवकर बरे होण्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार.”
दरम्यान, धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली. सुपरस्टार सलमान खानने सोमवारी सायंकाळी रुग्णालयात येऊन धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
धर्मेंद्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…