पुणे

पुण्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड विकी जाधव पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड विकास ऊर्फ विकी जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. मागच्या महिन्यात विकी जाधवने त्याच्या साथीदारांसह अभिजित दिघे यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांना गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या पत्नी व मुलाचा खुन करण्याची धमकी देखील दिलेली होती. त्यानंतर तो पुण्याबाहेर पळून गेला आणि सतत पोलीसांना गुंगारा देत होता. पोलिस दिवसरात्र त्याचा शोध घेत होते, अखेर त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील कात्रज भागातील भारत नगर याठिकाणी फिर्यादी अभिजित तुकाराम दिघे (वय ३५) रा.निंबाळकर वस्ती, कात्रज हे त्यांचा टेम्पो घेवुन घरी जात होते, यावेळी आरोपी दयानंद भीमराव सितापराव, त्याचा भाऊ सुमित भीमराव सितापराव तसेच विकी जाधव व त्यांचे इतर सहकारी हे फिर्यादी दिघे यांच्या टेम्पोसमोर आडवे आले. दिघे त्यांना बाजुला व्हा असे म्हणाले. त्यावरुन चिडलेल्या आरोपींनी दिघे यांना शिवीगाळ करुन लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दिघे यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या लोकांनाही त्यांनी धमक्या दिल्या. “कोणी पुढे यायचे नाही, आम्ही इथले भाई आहे, आमचे कोणी वाकडे करुन शकत नाही, कोणी पुढे आल्यास जिवंत सोडणार नाही, खलास करु एक एकाला” अशा धमक्या देवुन दहशत निर्माण केली. तसेच दिघे यांच्या पत्नी व मुलाचा खुन करण्याची धमकी दिली. आरोपींनी दिघे यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या  डोक्यात दगड मारुन गंभीर दुखापत केली.

दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर यातील आरोपी विकी ऊर्फ विकास जाधव पुणे शहराबाहेर पळुन गेला होता व तो सतत पोलीसांना गुंगारा देवुन वावरत होता. पोलीस संशयीत गुन्हेगारांचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार यांना त्यांच्या खब-याकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी विकी जाधव सातारा जिल्यातील दहीवडी, फलटण, माण या भागात आपला पेहराव बदलुन वावरत आहे. त्यानंतर पोलीसांनी सावधपणे तपास करुन त्याच्याबाबत माहीती काढुन बिजवडी, जिल्हा-सातारा या भागात सापळा लावुन तेथे राहणारा ऋषीकेश महादेव भोसले यांच्या वावरातुन त्याला ताब्यात घेतले आहे व त्या पुढील कारवाईसाठी भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे यांच्या ताब्यात दिले आहे.

आरोपी पोलीस अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द भारती विदयापीठ, वारजे माळवाडी, सिंहगड रोड, हिंजवडी व इतर पोलीस स्टेशनला खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरीचे चार गुन्हे, गंभीर दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाचे एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 307, 232, 504, 506, 34 क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल आहे .

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदशनाखाली युनिट-2, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, किशोर वग्गु, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने यांनी केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago