पुणे

फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये आढळले दोन मृतदेह

पुणे : फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये आज (२५ मे) सकाळी दोन मृतदेह आढळून आले, यातील एक मृतदेह महिलेचा आणि दुसरा पुरुषाचा आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत.

दरम्यान, हडपसर परिसरातील शिंदेवादी येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी रात्री महिलेचा शोध घेतला होता. मात्र, महिला सापडली नव्हती.

लोणी काळभोर पोलिसांनी अग्निशमन दलाला सकाळी फुरसुंगी येथे कॅनॉलमध्ये एका पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचले. जवान आणि परिसरातील कार्यकर्ते बच्चूसिंग टाक यांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. त्यांनी महिलेचा मृतदेह देखील बाहेर काढला. दोन्ही मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मंगळवारी सकाळी फुरसुंगी येथे महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी शिंदेवाडीच्या घटनेतील महिलेच्या नातेवाईकांना कळवले. त्यांनी येऊन ओळख पटवल्यानंतर हा त्याच महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, दुसऱ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

17 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago