पुणे

पुण्यातील कडबनवाडी गावात प्रशिक्षणार्थी विमानाची शेतात क्रॅश लँडिंग, महिला पायलट थोडक्यात बचावली

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात कार्व्हर एव्हिएशनचे विमान एका शेतात कोसळले. आज सकाळी 11.30 च्या सुमारास प्रशिक्षणार्थी विमान शेतात कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात 22 वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलट भाविका राठोड जखमी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाल्या आहेत. बारामतीत कार्व्हर एव्हिएशनच्या माध्यमातून वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी विमानाने कार्व्हर एव्हिएशन बारामती येथून उड्डाण केले आणि काही वेळाने अपघात झाला. इंधन संपल्याने विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आत्तापर्यंत याबाबत पुष्टी झालेली नाही.

अपघातानंतर महिला पायलट स्वतः कॉकपिटमधून बाहेर पडली. महिला वैमानिकावर इंदापूर तालुक्यातील शेलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार्व्हर एव्हिएशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत, तर पोलिसांनी घटनास्थळ सील करून तपास सुरू केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago