Three brothers and a pet dog drowned in a canal
पुणे : तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेत मयूर रामदास घोडे (10), आनंद विजय खाडे (11) आणि साहिल रंगनाथ घोडे (14) या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे ही घटना घडली.
निमगाव सावा येथील ओढ्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी मयूर, आनंद आणि साहिल रविवार (१३ मार्च) रोजी दुपारी सायकलवरून गेले होते. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली, त्यांनी गावकऱ्यांसह शोधाशोध सुरु केली. या दरम्यान, बंधाऱ्याच्या कडेला तिघांचे कपडे व चपला दिसल्या. त्यावरून ते ओढ्यात पोहण्यासाठी गेले असावेत असा संशय व्यक्त करण्यात आला. पाण्यात उतरून शोध घेतला असता त्यांचे मृतदेह पाण्यात आढळले. या घटनेने तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…