The bodies of mother and child were found at different places in Pune
पुणे : सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर रात्री एका सहा ते आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह कात्रज बोगद्याजवळ आढळून आला. हे दोन मृतदेह आई आणि मुलाचे असल्याचे उघड झाले आहे. मृत महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख आहे. परंतु, आलिया यांचे पती आबीद शेख मात्र अजूनही बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहत होते. चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवला आणि त्यासाठी ब्रीझा कार भाड्याने घेतली होती. त्यानंतर ते पिकनिकसाठी निघाले देखील होते. पण त्यानंतर काय झाले याविषयी कोणालाही माहिती नाही. दरम्यान, काल सकाळी सासवड गावात आलिया यांचा मृतदेह आढळून आला. त्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या. पोलीस या खुनाचा तपास करत असतानाच रात्री नवीन कात्रज बोगद्याजवळ एका मुलाचाही मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलीस तपासात समोर आले की काल सकाळी सासवडला ज्या महिलेचा मृतदेह आढळला, त्या आलिया यांचा हा मुलगा आहे.
दरम्यान, आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रीझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर आढळून आली आहे. आबीद शेख हे एका कंपनीत ब्रान्च मॅनेजर आहेत. ते बेपत्ता असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…