Supriya Sule
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत वाढली असून गाड्या फोडणे, नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू आहेत. आजही वारजे परिसरात या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत सुळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली.
पुणे आणि परिसरात वाढलेल्या या गुन्हेगारीवर आळा घालणे अतिशय गरजेचे असून संघटीत गु्न्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…