पुणे

स्पाइसजेटचे पुणे-दिल्ली विमान पुणे विमानतळावर परतले, उड्डाणानंतर वैमानिकाला तांत्रिक बिघाड जाणवला…

पुणे : सोमवारी सकाळी पुणेहून दिल्लीकडे जाणारे स्पाइसजेटचे बोईंग ७३७ (VT-SLG) विमान उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड आढळल्याने परत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. विमानाने सुरक्षित लँडिंग केल्याची पुष्टी एअरलाइनने केली आहे.

विमान परत आल्यानंतर सर्व प्रवाशांना व्यवस्थितपणे उतरवण्यात आले. काही प्रवाशांनी याला आपत्कालीन लँडिंग असे संबोधले असले तरी विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले की कोणतीही आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आलेली नव्हती, तसेच मेडे कॉलही देण्यात आलेला नव्हता.

पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले की, “उड्डाणानंतर वैमानिकाला तांत्रिक बिघाड जाणवला. त्यानंतर त्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून पुण्यात परतण्याची परवानगी मागितली. विमान सुरक्षितपणे उतरले, ही घटना आपत्कालीन लँडिंग नव्हती.”

सुमारे एक तास हवेत राहिल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजनांतर्गत विमान परत आणण्यात आले. स्पाइसजेटने निवेदनात स्पष्ट केले की प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही आणि संपूर्ण प्रक्रिया मानक नियमांनुसार पार पडली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago