नाशिक

नाशिकमध्ये धक्कादायक घटना! पहिल्या पत्नीला जास्त वेळ दिल्याचा राग, दुसऱ्या पत्नीने भावांच्या मदतीने केली पतीची हत्या

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आडगाव-सैयद पिंपरी रोड परिसरात पतीने पहिल्या पत्नीला जास्त वेळ दिल्याच्या रागातून दुसऱ्या पत्नीने दोन भावांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पत्नी व तिच्या भावांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव भावसार मूलचंद पवार उर्फ बाला असून तो खेळणी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याने दोन लग्ने केली होती. मात्र तो आपल्या पहिल्या पत्नी निरमा पवार हिच्यासोबत जास्त वेळ घालवत होता. त्यामुळे दुसरी पत्नी सुनीता नाराज होती. याच रागातून शुक्रवारी (२९ ऑगस्ट) रात्री सुनीताने आपल्या दोन भावांसोबत राज शिंदे आणि आदित्य शिंदे यांना घेऊन भावसारला बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला.

पहिल्या पत्नीने केली तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपासून भावसार आणि दुसरी पत्नी सुनीता यांच्यात वाद सुरू होता. त्यांना मुलबाळ नसल्यामुळे भावसार पहिल्या पत्नीबरोबर अधिक वेळ घालवत होता. यावरून झालेल्या भांडणात सुनीताने आपल्या भावांच्या मदतीने पतीची हत्या केली. संध्याकाळी भावसारच्या किंकाळ्या ऐकून पहिली पत्नी व कुटुंबीय धावत आले, पण त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी, भावसारच्या पहिल्या पत्नी निरमा पवार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी सुनीता, तिचे भाऊ राज व आदित्य शिंदे, तसेच दीपक आणि आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago