पुणे

देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी असलेल्या मदत योजनेत मोठा घोटाळा

पुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना राज्य सरकारी आर्थिक मदत देण्याची जी योजना आहे, या योजनेत सामान्य महिलांची नोंदणी करून राज्य सरकारची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यातील निम्म्याहून अधिक रक्कम घेऊन अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन निर्णयाप्रमाणे देह विक्री करणाऱ्या महिलांची कोरोना काळात उपासमार होऊ नये यासाठी, त्यांची कोणतीही ओळखपत्र न घेता अनुदान वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या महिलांची यादी बनविण्याचे काम कायाकल्प संस्थेला देण्यात आले आहे. आरोपी हे या संस्थेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी संगनमत करून कट रचला आणि त्यांच्या कायाकल्प संस्थेकडून गोरगरीब, कष्टकरी महिलांना तीन महिन्याकरीता प्रत्येकी पाच हजार मिळणार असलयाची बतावणी केली. या महिलांची राज्य सरकारच्या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आर्थिक मदत योजनेत नोंदणी केली. त्यानंतर राज्य सरकारकडून काही महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले.

एका महिन्याचे पाच हजार, याप्रमाणे तीन महिन्याचे १५ हजार रुपये या महिलांच्या खात्यात जमा झाले. मात्र, आरोपींनी त्या महिलांकडून त्यातील १० हजार रुपये घेऊन स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेतला आहे. त्यामुळे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, शहरात या योजनेत अशा प्रकारे गैरप्रकार झाला असून, कारवाईची मागणी केली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago