पुणे

पुण्यासह ‘या’ पाच जिल्ह्यांत हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यात पुढील चोवीस तासांत 204.4 मिलिमिटर पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर गुरुवार नंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

तसेच आज मुंबईसह ठाणे परिसरात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago