पुणे

पुण्यातील गावात मोफत वितरित केले जाताय कंडोम, महिलांना 4 महिने गर्भधारणेपासून दूर राहण्याचा सल्ला

पुणे : पुण्याच्या 75 गावांमध्ये झिका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या गावांमध्ये लसीकरणाला गती देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, पुण्यातील बेलसर गावामध्ये झिका विषाणूचा धोका कमी करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला जात आहे.

पंचायतीने गावातील महिलांना 4 महिने गर्भधारणेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी आरोग्य विभागाची टीम घरोघरी जाऊन त्यांचे समुपदेशन करत आहे. तसेच पुरुषांना कंडोम मोफत वितरित केले जात आहेत. महाराष्ट्रात झिका विषाणूचे पहिले प्रकरण जुलैमध्ये बेलसर गावातच आढळले होते. गर्भवती महिलांना झिका विषाणूचा सर्वाधिक धोका असतो. झिका विषाणूमुळे गर्भातील बळावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचा त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या गावात महिलांना पुढील 4 महिने गर्भवती न राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

गावातील 55 वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. बेलसर गावात अनेक केंद्र आणि राज्यांच्या टीमने येऊन तपास केला आहे. उप सरपंच धीरज जगताप यांनी सांगितले की, पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये झिका विषाणू आढळल्याने गावाने हा निर्णय घेतला आहे. सुरक्षित सेक्स केल्याने, संसर्ग स्त्रियांमध्ये पसरणार नाही. आरोग्य विभागानेही ही पद्धत प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

गर्भवती महिलांना झिका होण्याचा धोका जास्त असतो. हा विषाणू पुरुषाच्या शुक्राणूमध्ये 4 महिने जिवंत राहतो. झिका बाळाच्या मेंदूचा विकास थांबवू शकतो. अकाली प्रसूती देखील होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे 4 महिन्यांसाठी गर्भधारणा टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून गावकऱ्यांना करण्यात आले आहे. त्यासाठी गर्भधारणा प्रतिबंधक उपाय म्हणून गावकऱ्यांना कंडोमचे वाटप केले जात आहे.

महाराष्ट्रात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण, जाणून घ्या काय काळजी घ्यावी…

झिका आजार काय आहे? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, लक्षणे, निदान व उपचार…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago