पुणे

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, मालवाहू ट्रकला धडकल्याने कारमधील चौघांचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर मालवाहू ट्रकला कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (9 एप्रिल) सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, स्थानिक पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. ही कार मुंबईच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 4.15 च्या सुमारास गहुंजे क्रिकेट स्टेडियमसमोर उभ्या असलेल्या ट्रकला स्कोडा कारने धडक दिली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातग्रस्त कार वेगात होती, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. चालकाने पन्नास मीटरपासून ब्रेक लावले होते. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago