पुणे

पुणे : खडकवासला धरणातून आज पाण्याचा विसर्ग सुरू होणार, नागरिकांसाठी ‘या’ आवश्यक सूचना

पुणे : पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे आज सायंकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे. खडकवासला धरण आज संध्याकाळपर्यंत १०० टक्के भरले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खडकवासला धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी ५ वाजल्यापासून १ हजार क्युसेकने सुरू होणार आहे. नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून तेथे ठेवलेले प्राणी तसेच इतर साहित्य बाहेर काढावे. सखल भागातील लोकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी”, असे अधिकृत संदेशात सांगितले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील याविषयी ट्विट केले आहे.

पुणे जिल्ह्यातील घाट विभागात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. IMD च्या आकडेवारीनुसार, ताम्हिणी घाट परिसरात गेल्या 24 तासात 230 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर लोणावळा येथे 136 मिमी आणि शिरगाव येथे 175 मिमी पावसाची नोंद झाली आहे. IMD ने पुणे जिल्ह्यासाठी 27 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 25 आणि 27 जुलै रोजी ‘घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस’ तर 26 जुलै रोजी ‘घाट भागात निर्जन ठिकाणी अति मुसळधार पावसाचा’ अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago