पुणे

पुण्यात खळबळ! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळास सार्वजनिक शौचालयात कोंबले…

पुणे : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळास जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयातील भांड्यात कोंबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर येथे ही घटना घडली आहे. परंतु, सुदैवाने पोलीस अंमलदार अजय माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने व अथक परिश्रमाने शौचालयात कोंबलेल्या या नवजात अर्भकास बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाई नगर, वडगाव येथे सार्वजनिक महिला समाज मंदिरामागे एका महिलेने नवजात अर्भकास जन्म देऊन शौचालयाच्या भांड्यामध्ये कोंबून ठेवले होते, असा कंट्रोलवरून सकाळी आठ वाजेच्या सुमारास कॉल आला. कॉलची माहिती मिळताच ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना महिला शौचालयात हे नवजात बाळ भांड्यात कोंबलेले आढळून आले. ते रडत होते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तात्काळ हे बाळ भांड्यातून वरती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे बाळ अर्धे भांड्यात आणि अर्धे लाईनमध्ये अडकले होते. त्यातच रक्तश्राव होत होता. त्यांच्या अथक परिश्रमानंतर बाळाला भांड्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर बाळाला उपचारासाठी तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या निर्दयी आणि भयंकर प्रकारामुळे सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्दयी महिलेस व तिच्या प्रियकरास ताबडतोड अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. हे नवजात बाळ मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago