पुणे

धक्कादायक! पुण्यात वेटरची फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्या, तेराव्या मजल्यावरुन मारली उडी

पुणे : पुण्यातील एका हॉटेलमध्ये फेसबुक लाइव्ह करीत एका वेटरने तेराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंटहाऊसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या वेटरचे नाव अरविंदसिंह राठोड (वय २६) असे असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदसिंह राठोड हा मूळचा उत्तराखंडचा राहणारा होता. तो महिन्याभरापूर्वीच मुंढवा येथील हॉटेल पेंटहाऊसमध्ये कामाला आला होता. मात्र या कालावधीत त्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्यातून बुधवारी रात्रीच्या सुमारास अरविंदसिंह राठोड हा हॉटेलच्या टेरेसवर १३ व्या मजल्यावर गेला आणि त्याने फेसबुक लाइव्ह केले. यावेळी मी आत्महत्या करणार असून हॉटेलमधील काही व्यक्तींनी माझे वाईट केले आहे. फसवून माझ्याकडून काही काम करुन घेतले आहे, असं तो म्हणत होता. हे पाहून अरविंदसिंह याला अनेकांनी फोन देखील केले. त्याला आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काही क्षणातच खाली उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मुंढवा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago