Industrialist Rahul Bajaj passes away
पुणे : बजाजचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज हे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे.
राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे मारवाडी उद्योगपती कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांच्या घरी झाला. बजाज आणि नेहरू कुटुंबात तीन पिढ्यांपासून कौटुंबिक मैत्री होती. राहुल यांचे वडील कमलनयन आणि इंदिरा गांधी यांनी काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतले होते.
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींपर्यंत पोहोचली आणि स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी बनली. 2001 मध्ये त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता. 2005 मध्ये राहुल यांनी कंपनीची कमान मुलगा राजीवकडे सोपवण्यास सुरुवात केली. 2008 मध्ये, त्यांनी बजाज कंपनीचे तीन भागात विभाजन केले. बजाज ऑटो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह असे ते विभाजन होते. सध्या त्यांची मुलं राजीव बजाज आणि संजीव बजाज कंपनीचे दैनंदिन व्यवहार सांभाळत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…