पुणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, आगामी काही तासांत घाटमाथा परिसर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात पुणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सखल भागात राहणारे नागरिक आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांनी अधिक सावध राहण्याचे सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २० जुलैपर्यंत पुण्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पर्यटक, ट्रेकर्स आणि वाहनचालकांनी त्या भागांमध्ये जाणे टाळावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…