पुणे

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांवर आरोपपत्र दाखल

पुणे : वैष्णवी शशांक हगवणे हिच्या हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी पुणे सत्र न्यायालयात एकूण ११ आरोपींविरुद्ध सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे.

बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १,६७० पानी आरोपपत्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले असून, त्यामध्ये सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात आले आहेत.

ही घटना मुळशी तालुक्यातील भूकूम येथील मुक्ताई गार्डन परिसरातील आहे. २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली होती. तिच्या सासरच्या मंडळींकडून करण्यात आलेल्या मानसिक व शारीरिक छळामुळे तिने आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपपत्रातील प्रमुख आरोपी पुढीलप्रमाणे:

शशांक राजेंद्र हगवणे (२७) – पती; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा मुख्य आरोप

राजेंद्र तुकाराम हगवणे (६३) – सासरे; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

लता राजेंद्र हगवणे (५४) – सासू

करिश्मा राजेंद्र हगवणे (३१) – नणंद

सुशील राजेंद्र हगवणे – दीर

वरील सर्व आरोपी भूकूम येथील मुक्ताई गार्डनजवळ राहतात.

इतर आरोपी :

नीलेश चव्हाण (३५), कर्वेनगर – वैष्णवीच्या मुलाला बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवणे आणि तिच्या नातेवाईकांना पिस्तूलने धमकावल्याचा आरोप

प्रीतम वीरकुमार पाटील (४७), कांगोली, बेळगाव (कर्नाटक) – मुख्य आरोपींना पळवून नेऊन आश्रय दिल्याचा आरोप

मोहन उर्फ बंडू उत्तमराव भेगडे (५९), वडगाव मावळ
बंडू लक्ष्मण फाटक (५५), लोणावळा
अमोल विजय जाधव (३५), पुसेगाव, सातारा
राहुल दशरथ जाधव (४५), पुसेगाव, सातारा
वरील चौघांवर मुख्य आरोपींना मदत केल्याचा आरोप असून, त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

न्यायिक प्रकिया व जामीन अर्ज:

सध्या आरोपींपैकी सहा जण न्यायालयीन कोठडीत असून, त्यात हगवणे कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.

लता हगवणे, करिश्मा हगवणे आणि नीलेश चव्हाण यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.

नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

लता आणि करिश्मा हगवणेच्या अर्जावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

या अर्जांवरील सुनावणीनंतर औपचारिकरित्या आरोप निश्चित केले जातील आणि खटल्याची मुख्य कार्यवाही सुरू होईल.

या हाय-प्रोफाईल प्रकरणात सरकारतर्फे प्रतिनिधित्व करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago