पुणे

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट

पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले आणि महर्षी कर्वे स्मारकालाही भेट दिली.

राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेच्या परिसराची पाहणी करताना प्रथम संस्थेचे वास्तुरचना महाविद्यालय, ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत चालविली जात असलेली संपदा बेकरी आणि संस्थेची प्रथम वास्तू असलेली ‘कर्वे यांची झोपडी’ या ठिकाणी भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यांनी कर्वे शिक्षण संस्था परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले व संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, उपाध्यक्ष सागर ढोले पाटील, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी, आजन्म सेवक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधुरी खांबेटे उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago