Dr. Sharad Gadakh to be new VC of Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth (PDKV), Akola
मुंबई : राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शरद रामराव गडाख यांची अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. गडाख यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ. गडाख यांची नियुक्ती पाच वर्षांकरिता किंवा ते वयाची ६५ वर्ष पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर येईल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.
डॉ. गडाख (जन्म २९ नोव्हेंबर १९६१) यांनी राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून वनस्पती शरीर विज्ञान विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासन व विस्तार कार्याचा व्यापक अनुभव आहे. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक प्रो. एस. अय्यप्पन यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह व कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. गडाख यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी संपल्यानंतर कुलगुरुपद रिक्त झाले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…