Gang rape of a 14-year-old girl in Pune
पुणे : पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन जण येत असून त्यांनाही तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत असं तिला सांगण्यात आलं. पीडितेने याला विरोध केल्यानंतर, आरोपींनी तिच्या छातीवर गोळी झाडली. परंतु, तिथे मोबाईल ठेवलेला असल्यामुळे ती बचावली.
पुण्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर 15 दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्या 14 वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणात हडपसर येथे राहणाऱ्या कृष्णा ऊर्फ रोहन ओव्हाळ(24) आणि वारजे माळवाडीतील निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (२०) या दोघांना अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या मैत्रिणी सोबत एका मित्राच्या वाढदिवसाला वारजे माळवाडी येथे गेली होती. वाढदिवसानिमित्त पार्टी असल्याचं सांगून 14 वर्षीय मुलीला बोलावलं. यावेळी वाढदिवस झाल्यानंतर तिला एका खोलीत नेऊन तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन जण येत असून त्यांना तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे असल्याचे त्यांनी तिला सांगितले.
पीडित तरुणीने याला विरोध केल्यानंतर एका आरोपीने पिस्तूल काढली आणि तिच्या छातीवर गोळी झाडली. पण पीडित तरुणीने तिथे मोबाईल ठेवलेला असल्याने तिचा जीव वाचला. तिला थोडी दुखापत झाली. त्यानंतर या तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीला कात्रज येथे सोडून देण्यात आले. तेथील एका रुग्णालयात जखमेवर उपचार घेऊन ती तरुणी घरी गेली. त्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…