पुणे

पुणे : पोलीस उपायुक्तांकडून कायदा व सुव्यवस्थेसाठी आदेश जारी, 14 दिवसांसाठी ‘या’ कृत्यांवर बंदी

पुणे : पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. हे नियम 28 जून रोजी 1 वाजल्यापासून ते दिनांक 11 जुलै रोजी बारा वाजेपर्यंत 14 दिवसांसाठी लागू राहतील. याबाबत पुणे शहर पोलीस उप-आयुक्त आर. राजा यांनी आदेश जारी केले आहेत.

पुणे शहरात ज्याअर्थी जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद आणि उपोषणासारखे आंदोलन करतात, तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यास पुरेसे आणि सबळ कारण असल्याचे सांगत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

14 दिवसांसाठी ही कृत्ये करण्यास मनाई :

  1. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
  2. दगड अथवा शस्त्र किंवा अस्त्रे तसेच सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
  3. शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
  4. कोणत्याही इसमाच्या चित्रांचे, प्रतीकात्मक प्रेताचे, पुतळ्याचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतीमेचे प्रदर्शन व दहन करणे.
  5. मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजवणे.
  6. सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे. कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.
  7. ज्यायोगे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) विरुद्ध वर्तन करणे.

वरील सर्व कृत्यांवर पोलिसांमार्फत बंदी घालण्यात आली आहे. या दरम्यान शासन किंवा महानगरपालिका आयुक्त पुणे यांच्या कोरोना विषयक प्रतिबंधक उपाययोजना व मार्गदर्शक तत्वे व त्यातील तरतुदी हे देखील या दरम्यान लागू राहतील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे 37 पोटकलम (३) नुसार पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाचे जर कोणीही उल्लंघन केले तर संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र असेल, असे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी म्हटले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago