पुणे

महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.

पवार म्हणाले, 15 ते 18 वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन लशीचा अधिक प्रमाणात पुरवठा होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. तसेच सभागृह आणि खुल्या मैदानातील कार्यक्रमांना 200 पेक्षा अधिक व्यक्तिंच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्याबाबत राज्यस्तरावर चर्चा करण्यात येईल. शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रमांना परवानगीबाबतही शासनस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.

बैठकीत राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 15.10 टक्के होता. मागील आठवड्यात 19 हजार 273 नवीन रुग्ण आढळले आणि 46 हजार 338 रुग्ण कोविडमुक्त झाले. जिल्ह्यात एकूण 1 कोटी 69 लाख 52 हजार लसीकरण झाले आहे. 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या 47 टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे, तर 15 ते 18 वयोगटातील 69 टक्के मुलांनी लशीची मात्रा घेतली आहे. लशीच्या पहिल्या मात्रेचे 110 टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे 87 टक्के लसीकरण झाले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे, जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते. तसेच आमदार माधुरी मिसाळ, अशोक पवार, अतुल बेनके, दिलीप मोहिते, चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, कृष्ण प्रकाश, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

बैठकीपूर्वी कौस्तुभ बुटाला यांनी सामाजिक दायित्व अंतर्गत नाविन्यपूर्ण आरोग्य सुविधांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आमदार अरुण लाड यांच्या विकास निधीतून प्राप्त रुग्णवाहिका आणि आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या 5 फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले, तसेच हिराभाई बुटाला विचारमंच मार्फत ससून सर्वोपचार रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि मोबाईल ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago