पुणे

नवले ब्रिज परिसरातील अपघातातील मृतांचा आकडा वाढला, सात जणांचा मृत्यू, 15 ते 20 जण जखमी

पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. दोन कंटेनर आणि एका कारचा झालेला हा अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या ट्रकने पुढे असलेल्या पिकअप व्हॅनला धडक दिली. त्यामुळे पिकअप पलटी झाला आणि ट्रक पुढे असलेल्या अनेक गाड्यांना धडक देत एका कारवर जाऊन आदळला. या धडकेनंतर भीषण स्फोट झाला आणि मोठी आग लागली.

अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दोन कंटेनर आणि कार पूर्णतः जळून खाक झाले होते. या कारमध्ये अडकलेले काही लोक जिवंत जळाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

पुण्याचे डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले की, “सातारा-पुणे महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पंधरा ते वीस वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रक छोट्या कारवर आदळला आणि स्फोट झाला. त्यात कारमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे.” काही जण अडकलेले असून, त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अपघातानंतर मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक शाखेने महामार्गावरील वाहनांना वळविण्याची व्यवस्था केली आहे.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago