पुणे

दिलासादायक! पुण्यात मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस काका/दिदी यांची नेमणूक, जाणून घ्या सविस्तर…

पुणे : पुणे शहरातील शाळांमधील बालके, लहान मुले, कॉलेजमधील व अन्य प्रशिक्षण संस्थेतील, आश्रमशाळेतील अथवा तत्सम संस्थेतील मुले-मुली यांची सुरक्षा व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस काका/दिदी यांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त शाळेत न जाणारी बालके, निराश्रीत, निराधार, रस्त्यावरुन किंवा निर्जन ठिकाणी एकटी-दुकटी फिरणारी लहान मुले, बालके यांच्या समस्या, सुरक्षा याबाबतचे कामसुध्दा पोलीस काका/दिदी पाहतील.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस अधिकारी, पोलीस काका/दिदी हे त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा-कॉलेज येथे भेटी देऊन योजनेची कार्यपध्दती सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना समजावून सांगतील. शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींच्या मनात पोलीस म्हणजे संकट काळात कायदेशिर मदत करण्यासाठी धाऊन येणारे मित्र व मार्गदर्शक आहेत, अशी प्रतिमा तयार करतील. पोलीस काका/दिदी हे शाळा, कॉलेज, तसेच अन्य प्रशिक्षण संस्थांना नियमीतपणे भेटी देतील. शाळा-कॉलेज येथे भेटीच्या दरम्यान मुलींचे छेडछाडीचे प्रकार, दादागिरी, रॅगिंग, सायबर क्राईम अथवा अन्य तत्सम गैरप्रकारांच्या संबंधात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण अथवा त्रास होत असल्यास त्याबाबत मुलांनी आपल्या शाळेतील पोलीस काका व दिदी यांना कळवावे. त्यामुळे त्यांना तात्काळ मार्गदर्शन व मदत मिळेल.

संबंधित शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक/प्राचार्य अथवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीसांच्या कामकाजात आवश्यक ते सहकार्य करावे. शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्थांमध्ये पोलीस काका व दिदी यांच्याकडुन कार्यशाळा, शॉर्ट फिल्मचे आयोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शोषण, गुड टच-बॅड टच तसेच, अन्य गैरप्रकारांबाबत व्याख्याने देऊन जागृती व प्रबोधन करण्यात येईल. मुलींची, महिलांची वसतिगृहे, आश्रमशाळा, महिला सुधारगृहे इत्यादी ठिकाणी पोलीस काका/दिदी नियमितपणे भेट देतील व तेथील मुलींच्या, महिलांच्या समस्या, तक्रारी समजून घेतील व त्याचा निपटारा करतील.

या कामगिरीकडे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कटाक्षाने लक्ष देतील. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी पोलीस काका/दिदी यांना विद्यार्थ्यांकडून फोन आल्यास, पोलीस काका/दिदी त्यांना तात्काळ मार्गदर्शन व मदत करतील. शाळा-कॉलेजमध्ये तक्रारपेटी बसवून, ती दर सोमवारी शाळेतील नोडल अधिकारी यांच्या समक्ष उघडून, प्राप्त तक्रारींवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. शाळा, कॉलेज मधील विद्यार्थ्यांना पॉक्सो ऍक्ट, जे.जे. ऍक्ट यांच्याबाबत व्याख्याने देऊन, कायद्यामध्ये मुला-मुलींविषयक असलेल्या तरतुदींबाबत मार्गदर्शन देण्यात येईल.

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याबाबत कळविण्यात आले आहे. खाजगी तसेच मनपाच्या शाळा-कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा उपाय करण्यासाठी शाळा-कॉलेज यांना प्रोत्साहीत करावे. उदा. उच्च क्षमतेचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे, शाळेत अनोळखी इसमास प्रवेश न देणे, संस्थेच्या मुख्य प्रवेशव्दारात बाहेरुन येणाऱ्यांची नोंदणी पुस्तिका ठेवणे (संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक), विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना, आधार कार्ड, चारित्र्य पडताळणी प्रत पोलीस ठाण्यात जमा करण्यात यावी, पालक शाळेत विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येईपर्यंत विद्यार्थ्यांबरोबर शाळेतील सेवकवर्गाने थांबणे गरजेचे आहे, इत्यादी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर परिणाम करणारी कोणतीही मोठी बाब संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

महाराष्ट्र शासन परिपत्रकान्वये प्रत्येक शाळेने “सखी सावित्री” समिती शाळेमध्ये गठित करावी. सदर समितीमध्ये संबंधित पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी/महिला अंमलदार (पोलीस दिदी) या सदस्य आहेत. त्या शाळेमध्ये होणाऱ्या बैठकीला हजर राहतील. पोलीस स्टेशनकडील नोडल अधिकाऱ्यांकडून “पोलीस काका/दिदी” ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे, याचा साप्ताहिक आढावा घेण्यात येणार आहे. शाळा-कॉलेजमधील नोडल अधिकारी (शिक्षक/कर्मचारी) परिपाठ अगर प्रार्थनेच्या वेळी सदर योजनेचा विद्यार्थ्यांकडून योग्य प्रकारे लाभ घेतला जात आहे, याची वेळोवेळी खात्री करतील. शाळा, कॉलेज सुरु होण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी संबंधित पोलीस स्टेशनकडील बीट मार्शल व दामिनी पथक गस्त घालतील. कोव्हीड-19 संसर्गजन्य प्रादुर्भावाच्या नंतर सदर योजना सुरळीत चालू झाली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

16 तास ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

16 तास ago

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…

16 तास ago

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…

17 तास ago

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण ; ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…

17 तास ago

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…

17 तास ago