क्राईम

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार, आरोपीला अटक

भंडारा : धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. साकोली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणात राजेश ईश्वर मडावी (वय 19) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश नागपूर येथे फिरायला जाण्याचा बहाण्याने अल्पवयीन मुलीला साकोली येथून बसने घेऊन गेला. रात्रीची वेळ असल्याने आणि बसमध्ये वाहक नव्हता हे बघितल्यानंतर आरोपीने बसच्या शेवटच्या सीटवर धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर राजेश अल्पवयीन मुलीला घेऊन रात्री बोदरा येथे त्याच्या घरी परतला.

दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी तपास केला तेव्हा बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता मुलगी राजेश मडावीसोबत गावातच असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि राजेश मडावी या दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या आधारावर पोलिसांनी आरोपी राजेश मडावी याच्यावर भादंवि कलम 376, 363 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago