पुणे

SRPF जवानाने अंतर्गत वादातून सहकाऱ्यावर झाडली गोळी, मग स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

पुणे : राज्य राखीव दलाच्या (SRPF) जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार करुन स्वतःवरही गोळी झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली येथील मरपल्ली येथे ही धक्कादायक घटना घडली. हे दोघेही पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एसआरपी कॅम्पचे जवान होते.

राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने सहकाऱ्याची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्यातील बॅरकमध्ये ही घटना घडली आहे. पुण्याहून हे दोन्ही जवान गडचिरोलीमधील पोलीस मदत केंद्र (मरपल्ली) येथे तैनात होते. राज्य राखीव दलाच्या जवानांमधील अंतर्गत वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. श्रीकांत बेरड यांनी रागाच्या भरात रायफलमधून बंडू नवतरला यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत:वर बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली.

जवानाने आपल्या रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दोन्ही जवानांचा जागीच मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

10 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago