पुणे

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई, येरवडा परिसरात सुमारे 7 लाख 88 हजाराचे अंमली पदार्थ जप्त

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात एका गुन्हेगाराकुडन 7,88,350 रुपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ३ जून रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1 चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे स्टाफसह येरवडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना येरवडा येथील पर्णकुटी पायथा दरबार बेकरी समोरील सार्वजनिक रोडवर अंमली पदार्थ रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर ऊर्फ आयबा शहाजहान शेख हा संशयितरित्या फिरत असल्याचे त्यांनी बघितले.

पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांच्याकडील स्टाफने सदर इसमास संशयावरुन ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 7,81,३५० रुपये किंमतीचे 52 ग्रॅम ९० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच x 5,००० रोख रक्कम, १००० रुपये किंमतीचा ईलेक्ट्रॉनिक वजन काटा, १००० रुपये किंमतीचा मोबाईल फोन, छोटया पारदर्शक प्लास्टिक पिशव्या असा एकुण 7,88,350 रुपये किंमतीचा एैवज बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला. त्यानंतर त्याच्याविरुध्द येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago