A severe fire broke out at a jeweler's shop in Vanwadi
पुणे : पुण्यात वानवडी येथील एका ज्वेलर्सच्या या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचर जळून खाक झाले तर चांदीच्या मूर्ती आणि इतर वस्तू आगीत वितळून गेल्या. वानवडी येथील परमार पार्क सोसायटीत या दुकानाला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सच्या दुकानाला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. दुकानातून धुर येत असल्याचे पाहून नागरिकांनी तात्कळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर कोंढव्यातील अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी शटर उचकटून आग विझविली. दुकानातील सर्व फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असून आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…