Shiv Sena clarifies its role in Pooja Chavan suicide case
बीड: टिक टॉक स्टार पूजा चव्हाणच्या वडीलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लहू चव्हाण म्हटले कि लेक गमावल्याने माझ्यावर खूप मोठा आघात झाला असून पूजाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांनी मी अस्वस्थ झालो आहे. आमचे अर्धे कपडे काढलेच आहात. आता उरलेले कपडे तरी काढू नका. त्यातून आमची बदनामीच होईल आणि हि थांबवली नाही तर मी आत्महत्या करेन, असा उद्वेगच लहू चव्हाण यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हटले कि माझी लेक खूप चांगली होती. लोक तिला नाहक बदनाम करत आहेत आणि मी हे कुणाच्याही दबावाखाली बोलत नाही, असेही लहू यांनी स्पष्ट केले.
पूजा चव्हाणच्या वडिलांच्या भावना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. पूजाने केलेला संघर्ष, पोल्ट्री व्यवसायाच्या उभारणीसाठी तिने केलेली धडपड या सर्वावर प्रकाश टाकताना आपली कुणाबद्दल तक्रार नसल्याचेच सांगण्याचा त्यांनी एकप्रकारे प्रयत्न केला. पूजाच्या आत्महत्येनंतर कथित ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत आहेत. यात ठाकरे सरकार मधील मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाव घेऊन आरोप केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पूजाचे वडील लहू यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
पूजाशी माझं नियमित बोलणं व्हायचं. ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशीही मी पूजाशी बोललो होतो. तुला पैसे हवेत का, अशी विचारणा मी तिला केली. त्यावर ती नको म्हणाली होती. नंतर रात्री दोनच्या सुमरास तिच्या मित्राचा मला फोन आला. तिच्या डोक्याला मार लागल्याचं तो म्हणाला. ते ऐकून मला धक्काच बसला. मी लगेचच पुण्याला जायला निघालो आणि सकाळी पुण्यात पोहचलो. पण मला तिचा मृतदेहच पाहावा लागला. तिथेच मला भोवळ आली. हा माझ्यासाठी खूप मोठा आघात होता’, असे लहू यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी सांगितले. पूजा गॅलरीत बसली होती. रात्री दीडच्या सुमारास ती गॅलरीतून खाली कोसळली. तिला चक्कर येत होती, असे तिच्या मित्राने मला सांगितले. असे असताना मी आरोप तरी कुणावर करू?, असा उलट सवालही त्यांनी केला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…