महाराष्ट्र

ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक आणि वारसा स्मारकांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन टक्के रक्कम राखीव ठेवण्यासाठी विचार केला जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील विविध शहरांमधील ऐतिहासिक आणि वारसा स्मारकांचे जतन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व स्मारकांचे जतन करण्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन टक्के रक्कम राखीव ठेवण्यासाठी विचार केला जाईल. ही रक्कम येत्या तीन वर्षांसाठीच राखीव ठेवण्याबाबत विचार केला जाईल.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील चांदणी तलाव, रामेश्वर मंदिर, सावकार वाडा आदी केंद्र आणि राज्य संरक्षित स्मारकांच्या विकास आणि जतन-दुरुस्ती कामांसाठी सर्वांगीण विकास आराखडा पूर्ण करुन घेण्याचे नियोजन आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात येईल. तसेच केंद्र सरकारच्या विभागाशी पाठपुरावा केला जाईल, असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago