Legislature
मुंबई : मुंबई शहरातील कोळीवाड्यांचा विकास नवीन विकास नियमावलीनुसार केला जाईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईतील कोळीवाड्यांचे रेखांकन करण्यात आले आहे. रेखांकनाच्या बाहेर असलेल्या झोपडपट्टींचा विकास केला जाईल. मात्र रेखांकनात समावेश असलेल्या कोळीवाडा क्षेत्रांचा विकास करण्यासाठी नवीन विकास नियमावली तयार करण्यात येत आहे. त्या नियमावलीनुसार कोळी वाड्यांचा विकास केला जाईल. मुंबईतील विविध झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्रकल्पांबाबत सर्व आमदारांची व्यापक बैठक बोलावली जाईल. तसेच झोपडपट्टी पात्रतेबाबत एक विशेष कार्यप्रणाली विकसित केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
झोपडपट्टी पुनर्वसन विकास करताना भाडे न देणाऱ्या विकासकांविरुध्द कारवाई करण्यात येईल. भाडे देण्यासाठी सक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कॅप्टन आर. तमिल सेल्वन, अस्लम शेख, योगेश सागर, अतुल भातखळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…