Positive discussion of Industry Minister with representatives of Rickshaw, Taxi Union
मुंबई : रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. रिक्षा स्टॅन्ड, पार्कींगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षा चालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज यासारख्या अनेक विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्योगमंत्री सामंत यांच्या पुढाकाराने पंधरा दिवसांत या विषयासंबंधी सातत्याने बैठका घेऊन तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या अनेक संघटनांना विश्वासात घेऊन प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा केल्याबद्दल उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाचे विशेष आभार मानले. परिवहन सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन तसेच विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…