महाराष्ट्र

खोट्या खरेदी देयकाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी एकास अटक

मुंबई : अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ८८.८४ कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करुन घेऊन व त्याद्वारे जीएसटी कर रुपातील महसूल बुडविल्याप्रकरणी मे. सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्स / सनराइज मिल मेल / सनराइज केमिकल्सचे मालक हिरेन पारेख यांना राज्य वस्तू व सेवाकर विभाग, पुणे यांनी अटक केली आहे.

में, सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्स / सनराइज मिल मेल / सनराइज केमिकल्स यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि केमिकल्सचा व्यवसाय असून त्यांनी अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवांच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय मिळविलेल्या खोट्या खरेदी देयकांद्वारे जीएसटी कर बुडविला आहे, असे विभागाच्या लक्षात आले.

याबाबत आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संपूर्ण कारवाई राज्यकर सहआयुक्त पुणे दीपक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली व राज्यकर उपायुक्त सुधीर चेके यांच्या देखरेखीखाली तसेच अपर राज्यकर आयुक्त, पुणे धनंजय आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवाकर विभागाने आजपर्यंत या अटकेसह ४३ विविध प्रकरणात अटक केल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago