महाराष्ट्र

पु. ल. देशपांडे अकादमीचा कायापालट करण्यात येणार – अमित देशमुख

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रातील शिखर अकादमी म्हणून कार्यरत असणाऱ्या पु. ल. देशपांडे अकादमीचा कायापालट होणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात यावर भर देण्यात यावा, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

पु. ल. देशपांडे अकादमीला स्वायत्ता देण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, उपसचिव शैलेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राच्या कला परंपरेचे जतन करण्याचे काम या अकादमीच्या माध्यमातून होत असते. तर राज्यातील विविध कला क्षेत्रातील कलावंतांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांना समृद्ध करण्यात अकादमीचा मोठा वाटा आहे. या अकादमीमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची कलेविषयी अभिरुची समृद्ध करण्यासाठी अकादमीने यापुढील काळात काम करणे आवश्यक आहे. आजच्या काळाशी सांगड असून येणाऱ्या काळात या अकादमीचा कायापालट करता येईल याबाबत अभ्यास करण्यात यावा. तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील काम करणाऱ्या तज्ञ सल्लागार नेमून हे काम कशा पद्धतीने करता येईल याबाबतही माहिती घेण्यात यावी.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago