pimpari chinchwad unknown person fired on ncp mla anna bansode
पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या कथित गोळीबार प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या कंत्राटदार अँथोनी यांचे मॅनेजर तानाजी पवारने जीव वाचवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचा जबाब दिला आहे. आमदार अण्णा बनसोडेंनी दावा केला होता की तानाजी पवारने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांना गोळी लागल्याच्या खुणा अद्याप सापडलेल्या नाहीत. त्यामुळे, आमदार अण्णा बनसोडे यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातच आता आमदार बनसोडे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये आमदार अण्णा बनसोडे तानाजी पवारला धमकावत आहेत.
तानाजी पवार आज आमदारांना भेटायला त्यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर वाद झाला. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तानाजी पवारला मारहाण करत कार्यालयाबाहेर आणलं. तेव्हा तानाजी पवारने त्याच्याकडे असणाऱ्या बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. ह्या गोळ्या माझ्या दिशेने झाडल्याचा दावा आमदारांनी केला होता. मात्र पोलिसांना गोळीबाराच्या खुणा आढळल्या नाहीत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या तानाजी पवारांनी सांगितले की आमदारांचे कार्यकर्ते मला बेदम मारहाण करत होते. माझा जीव जाण्याची शक्यता होती, म्हणून बचावासाठी मी हवेत गोळीबार केला. अशातच काल झालेल्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला. यात अँथोनी यांच्या कार्यालयात आमदारांचे समर्थक आले होते. त्यांनी अँथोनी यांच्या कर्मचाऱ्यांवर शस्त्राने हल्ला केला होता. हा प्रकार गोळीबारानंतर आमदारांनी सांगितला नव्हता. त्यामुळे आता परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस कृष्ण प्रकाश यांनी दिली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…