मनोरंजन

मुकेश खन्ना यांच्यावर कोसळला दु: खाचा डोंगर, मोठी बहीण कमल कपूर यांचे कोरोनाने निधन

मुकेश खन्ना यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्यांमुळे काल सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पण आता त्यानंतर 24 तासातच मुकेश खन्ना यांच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. दिल्लीत राहणारी मुकेश खन्ना यांची मोठी बहीण कमल कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मुकेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली.

कमल कपूर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मुकेश खन्ना यांच्या मोठ्या बहिणीला 12 दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. परंतु, त्यांना एक दिवसापूर्वी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांना कोठेही आयसीयू बेड उपलब्ध होऊ शकला नाही. ज्यामुळे त्यांना वाचवता आले नाही आणि कमल कपूर यांचे निधन झाले.

मुकेश खन्ना यांचा भाऊ सतीश यांचा तीन आठवड्यांपूर्वी हार्टअटॅकमुळे मृत्यू झाला होता. त्या अगोदर सतीश यांना कोरोनाची लागण झाली होती. सतीश घरीच विलगीकरणात होते आणि सर्व प्रोटोकॉल पाळत औषधे पण घेत होते. नंतर 8 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्यानंतर त्यांचे निधन झाले.

मुकेश खन्ना यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असून गेल्या एका वर्षापासून ते कोणत्याही पार्टीला किंवा कार्यक्रमाला गेलेले नाहीत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago