महाराष्ट्र

नवाब मलिकांना मोठा दणका! संपत्ती जप्त करण्यास ईडीला मिळाली परवानगी

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांची काही मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिली आहे. मलिक यांना ईडीने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती.

महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री असलेले नवाब मलिक यांच्यावर कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमधील फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी सलीम पटेल यांच्यासह तीन एकरचा भूखंड बळकावल्याचा आरोप आहे. या कंपाऊंडला मुनिरा प्लंबर नावाच्या महिलेचे नाव देण्यात आले. या भूखंडावरील बेकायदेशीर अतिक्रमणे काढता यावीत म्हणून प्लंबरने या भूखंडाचे मुखत्यारपत्र सलीम पटेल यांना दिले होते. पण पॉवर ऑफ ऍटर्नी घेतल्यानंतर मुनिरा प्लंबरला मदत करण्याऐवजी पटेल, दाऊदची बहीण आणि नवाब मलिक यांनी त्या भूखंडावर कब्जा केला. हसीना पारकरच्या सांगण्यावरून पटेल यांनी हा भूखंड कुर्ला येथील रहिवासी नवाब मलिक यांच्या सॅलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला अत्यंत कमी किमतीत हस्तांतरित केला.

ईडीने गेल्या वर्षीच या डीलमध्ये मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली होती आणि प्रदीर्घ चौकशीनंतर नवाब मलिक यांना यावर्षी 13 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून मलिक न्यायालयीन कोठडीत असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या अटकेनंतर, या वर्षी एप्रिलमध्ये ईडीने त्यांच्या काही मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या. आता पीएमएलए कोर्टाने ईडीला मलिक यांच्या आणखी काही मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड, मलिक यांचे कुर्ला आणि वांद्रे येथील पाच फ्लॅट आणि उस्मानाबाद येथील 147 एकर शेतजमीन यांचा समावेश आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago