महाराष्ट्र

महाविद्यालयांमध्ये २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह’

मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एनएसएस बाबत बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी मिलिंद काळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांना समाजाभिमुख कार्यात सहभागी करून राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावता येते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मानवता, सहकार्य, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, साक्षरता मोहिमा, रक्तदान शिबिरे यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना समाजाशी थेट जोडणारी आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारी प्रभावी योजना आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

6 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago