नाशिक

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून या कामांना तत्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना बैठकीत दिली.

मंत्रालयातील दालनात नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत असलेल्या विविध प्रकल्प मंजुरीची बैठक पार पडली या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, लाभक्षेत्र विकास सचिव किरण कुलकर्णी, सहसचिव अतुल कपोते, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता अरूण नाईक, कार्यकारी अभियंता संगीता जगताप उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, उर्ध्व गोदावरी प्रकल्प प्रस्ताव, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजनांच्या कामांच्या बाबतीत राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नियोजन विभाग अशा वेगवेगळ्या पातळीवर प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून ही कामे मंजूर करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून एक उच्चस्तरीय बैठक घेऊन संबंधित यंत्रणांकडून ही कामे मंजूर होण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागातंर्गत असलेले प्रकल्प मार्गी लागतील, असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील प्रकल्पांची कामे लवकर सुरू करा – पालकमंत्री भुजबळ

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा, ननाशी, मांजरपाडा (देवसाने), गोळशी महाजे, यासह इतर प्रवाही वळण योजना, तसेच पुणेगाव दरसवाडी आणि दरसवाडी – डोंगरगाव कालवा विस्तारीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्णं कामे मार्गी लागतील. कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी या प्रवाही योजनांना प्रशासकीय मान्यता तर नाशिक शहराच्या भविष्यातील पाण्यासाठी किकवी पेयजल प्रकल्पालाही सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

त्याचबरोबर पार – गोदावरी उपसा जोड योजनेमुळे पूर्वेकडे वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे. या योजनेत धरणे एकमेकांशी नैसर्गिक उताराने बोगदा व बंद नलिकांद्वारे जोडून मध्यवर्ती धरणाच्या पाणीसाठ्यातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. सर्व धरणे एकमेकांस समान संचय पातळीत जोडण्यात येणार असल्यामुळे या सर्व साठ्यांचे एकात्मिक जलनियोजन त्यामुळे शक्य होणार आहे. गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पार -गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक ३ व ४ मंजूर करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री यांच्याकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago