Nashik Families Donate Over ₹1 Lakh to CM Relief Fund for Flood-Affected Farmers
नाशिक : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज नाशिक येथील डॉ. दिग्पाल गिरासे, आणि मयूर अलई यांच्या कुटुंबांतर्फे अनुक्रमे ५१ हजार आणि ५१ हजार १११ रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द केला.
या मदतनिधीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरासे आणि अलई कुटुंबांचे कौतुक केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. गिरासे यांच्या पत्नी शुभांगी गिरासे, मुले अद्वैका आणि कियांश, मयूर अलई यांच्या पत्नी प्रियांका अलई, मुले आरोही आणि आरव उपस्थित होते. डॉ. गिरासे आणि अलई कुटुंबाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेली मदत बहुमोल असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
डॉ. गिरासे यांनी सांगितले की, मुलांनी दिवाळीत खर्च करण्याऐवजी हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यानुसार मदतीचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे प्रदान करण्यात आला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…