महाराष्ट्र

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन व्यापक स्वरूपात राबविणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राज्याची महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांचा समावेश होता. आता यात नव्याने 5 जिल्ह्यांचा समावेश करून 21 जिल्ह्यांत ही योजना व्यापक स्वरूपात राबविणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत झालेल्या गैरव्यवहाराचा प्रश्न विधानसभा सदस्य माधवराव पवार यांनी उपस्थित केला होता.

मंत्री मुंडे म्हणाले की, या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील कामांबरोबरच पहिल्या टप्प्यात राहिलेली अर्धवट कामे देखील पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच या योजनेतील काही थकीत देयके असल्यास तीदेखील अदा करण्यात येतील, अशीही माहिती यावेळी मंत्री मुंडे यांनी दिली. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य राजेश टोपे, समीर कुणावार, नमिता मुंदडा, सुरेश वरपुडकर यांनी सहभाग घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago