महाराष्ट्र

नाग नदी प्रदूषण निर्मूलनासाठीची कामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

नागपूर : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत नागपूर येथील नाग नदी प्रदूषण प्रतिबंध प्रकल्पाच्या १,९२६ कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य डॉ.परिणय फुके यांनी नाग नदी प्रदूषणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.

पर्यावरणाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना मंत्री मुंडे म्हणाल्या, नाग नदी प्रदूषण निर्मूलनाबाबत एकूण पाच पॅकेजेसमध्ये कामाचे नियोजन केले जात आहे. यामध्ये एसटीपी, सिवरेज लाईन, विद्युत शव दाहिनी आदींचा समावेश आहे. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पांतर्गत ९२ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल शुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे. नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुढे सोडण्यात येत आहे, त्यामुळे गोसीखुर्द धरणातील मासेमारी नियमित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटीपी प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प बंद असल्याबाबत सदस्य डॉ.परिणय फुके यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत एका समितीच्या माध्यमातून पुन्हा तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण उपाययोजनांसाठी जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची देखील मदत घेण्यात येत असल्याची माहिती देऊन जायका कंपनीच्या निकषांनुसार सर्व कामे करण्यात येत असून सर्व कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago