नागपूर

छत्रपती संभाजीनगर येथील बोगस कामगार प्रकरणाची पुन्हा चौकशी करणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

नागपूर : छत्रपती संभाजीनगर परिसरातील काही आस्थापनांमध्ये बोगस कामगार दाखवून त्यांच्या नावाने पगार काढल्याच्या प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करण्यात आली असून, संबंधित प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, बोगस नोंदणी आणि पगाराच्या गैरव्यवहारांना आळा बसावा यासाठी बायोमेट्रिक हजेरी, ऑनलाईन नोंदणी, आणि आस्थापना मंडळ व संघटना यांच्या पडताळणीसह सर्टिफिकेशनची प्रक्रिया अनिवार्य आहे. माथाडी मंडळांमध्ये निरीक्षक व कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करण्याची प्रक्रिया मार्गी लावली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल. भविष्यातील धोरणात्मक बदलांसाठी सर्वपक्षीय मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago