नागपूर

तरुणीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नृत्य शिक्षकाला अटक

नागपूर : २२ वर्षीय तरुणीला दारू पाजून नृत्य शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रोमियो गजानन गोडबोले (वय २५), असे या नृत्य शिक्षकाचे नाव आहे. अजनी पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करून या व्यक्तीला अटक केली आहे.

पीडित तरुणी मूळची वर्ध्याची असून तिचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळे ती तणावात होती. काही दिवसांपूर्वी तिची सोशल मीडियावर या नृत्य शिक्षकासोबत ओळख झाली. त्याने तिला आश्वासन दिले की तो तिला तणावातून बाहेर येण्यास मदत करेल. धुलीवंदनाच्या दिवशी तो तरुणीच्या फ्लॅटमध्ये गेला. तेथे तिला तणाव दूर करण्यासाठी दारू पिण्याचा सल्ला दिला. तरुणीने दारू प्यायली. ती नशेत असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे अश्लील फोटो देखील काढले.

काही वेळाने तरुणी शुद्धीवर आली. त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याबाबत तिने गोडबोलेला जाब विचारला. त्यावर त्याने तरुणीला काढलेले फोटो दाखवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणीने या धमकीला न घाबरता नातेवाइकासोबत जाऊन अजनी पोलिस स्टेशनमध्ये गोडबोलेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोडबोलेला अटक देखील केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago